अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला महिला वरीष्ठ महाविद्यालयाची स्थापना १ ऑगस्ट १९९० रोजी झाली. हे महाविदयालय महाराष्ट्रातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, शी संलग्न आहे. सोलापूरच्या पूर्व भागात तेलुगू भाषा बोलणारा पद्मशाली समाज आहे.या समाजातील मुली पद्मशाली शिक्षण संस्थेच्या ए.आर बुर्ला महिला महाविदययालयातून उच्च शिक्षण घेत आहेत.
सेठ रामचंद्र रामय्या बुर्ला हे सोलापुरातील एक यशस्वी कापड व्यावसायिक आणि उत्पादक होते. त्यांनी पद्मशाली समाजातील विद्यार्थ्यांनीसाठी वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी भरीव योगदान दिले . अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला महिला महाविद्यालयासह पद्मशाली शिक्षण संस्थेच्या अनेक शाखा सुरु करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला महिला वरीष्ठ महाविद्यालयाचे उद्घाटन संस्थेचे माजी विश्वस्त आणि सरचिटणीस गंगधरपंत कुचन यांच्या हस्ते झाले.
ए.आर.बुर्ला महाविदयालयास इ.स. २००४ मध्ये प्रथमच राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने २.७९च्या सीजीपीएसह पाच वर्षांच्या कालावधीसाठी बी ++ ग्रेडसह मान्यता दिली. एनएएसी मान्यताच्या दुसऱ्या चक्रात, कॉलेजला २०१२२ मध्ये २.६२ च्या सीजीपीए सह बी ग्रेड देण्यात आला. एनएएसी मान्यताच्या तिसऱ्या चक्रात, कॉलेजला २.७६ च्या सीजीपीएसह बी ++ ग्रेड देण्यात आला.
इ.स. १९९९पासून डॉ.राजेंद्र शेडगे हे महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. इ.स.१९९० मध्ये २० विद्यार्थ्यांनीसह सुरू झालेल्या या महाविद्यालयात आज १२०० विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. १ ऑगस्ट २०२१ रोजी महाविदयालयाच्या स्थापनेस ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत.या ३१ वर्षाच्या वाटचालीत विदयापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाविदयायातून पारंपारिक शिक्षणाबरोबर कौशल्याधारित अभ्यासक्रमाचे शिक्षण घेऊन विदयार्थीनीच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून आले आहे.विदयार्थीनींनी विविध क्षेत्रात यशस्वी भरारी घेतली आहे.आज सोलापूरमधील एक नामांकित महाविदयालय अशी ओळख महाविदयालयास प्राप्त झाली आहे.